Home जालना खासदार डॉ.कल्याण काळे यांनी घेतली खत टंचाई बाबत आढावा बैठक.

खासदार डॉ.कल्याण काळे यांनी घेतली खत टंचाई बाबत आढावा बैठक.

84

आशाताई बच्छाव

1001642504.jpg

खासदार डॉ.कल्याण काळे यांनी घेतली खत टंचाई बाबत आढावा बैठक.
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –आज दिनांक २७.०६.२०२५ शुक्रवारी  जिल्ह्यात खत टंचाई बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात, जालना येथे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी बैठक घेऊन ऐन खरीपाच्या पेरणीच्या तोंडावर खत टंचाई बाबत आढावा घेतला ही कृत्रिम खत टंचाई आहे खत कंपन्या जाणीवपूर्वक पुरवठा करत नाहीत शेतकरी चढ्या दराने खत खरेदी करतो  200 लाख मे टन खताचं उद्दीष्ट आहे जुन महिन्यात 87000 हजार मे टन वितरणात आलेल आहे युरीया खताचा तुटवडा जाणीवपूर्वक केला जातो खता सोबत इतर उपवस्तु जबरदस्तीने दिल्या जातात त्यासाठी युरीयाची अट घातली जाते तसेच डीएपी खताची सुद्धा मोठ्या प्रमाणात टंचाई जिल्ह्यात जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या माथी जबरदस्तीने नको असलेले खते व औषधे मारली जातात. याबाबत सविस्तर आढावा घेऊन अधिकारी व खत कंपन्यांच्या प्रतिनिधींना सूचना केल्या. नवीन e-pos मशिन उपलब्ध करून देण्या बाबत सुचना केल्या जिल्ह्यात 1085 अधीकृत परवाना धारक आहेत खत कंपन्यांना व जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुसुत्रता येण्याबाबत सक्तीच्या सुचना केल्या. जालना जिल्ह्याची खताची मागणी एप्रिल २०२५ ते जुन २०२५ पर्यंत पुढील प्रमाणे आहे. युरिया मागणी २९५३४ मेट्रिक टन, पुरवठा २२४१८ मेट्रिक टन एकूण ७११६ मेट्रिक टन युरिया पुरवठा कमी आहे. तसेच डीएपी मागणी १३८८३ मेट्रिक टन, पुरवठा ८१७७ मेट्रिक टन एकूण ५७०६ मेट्रिक टन डीएपी पुरवठा कमी आहे. एमओपी मागणी १२३९ मेट्रिक टन, पुरवठा 593 मेट्रिक टन एकूण ६४६ मेट्रिक टन पुरवठा कमी तसेच एसएसपी मागणी १६०१६ मेट्रिक टन, पुरवठा १२५३३ मेट्रिक टन एकूण ३४८३ मेट्रिक टन पुरवठा कमी. खत कंपन्यांनी फक्त एनपीके चा पुरवठा मागणीपेक्षा जास्त केलेला आहे.

Previous articleजिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली पावसाची शाळा
Next articleपत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.