Home नाशिक रुई विद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

रुई विद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

132

आशाताई बच्छाव

1001642555.jpg

रुई विद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

प्रसंगी गुरुकुल आश्रमातील तसेच नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

रुई तालुका निफाड येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरी करून गुरुकुल आश्रमातील तसेच विद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ.प ज्ञानेश्वर माऊली शिंदे ( साधना आश्रम रुई ) होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रंगनाथ दौलत तासकर, त्रंबक आबाजी चव्हाणके उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य तसेच व्यासपीठावर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दौलत तासकर ,प्राचार्य अर्जुन चव्हाण सर, शिवनाथ तुकाराम निकम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संपत रोटे, अर्जुन रोटे ,दिनकर खडांगळे ,स्थानिक सल्लागार समिती सदस्य सोमनाथ गायकवाड ,राहुल गायकवाड, वसंतराव दहे,श्री.विजय बोरगुडे, पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.सर्वप्रथम अध्यक्ष, प्रमुख पाहुणे,पालक,सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.चौरे ए.डी सर यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा दिली.नंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. शाहू महाराज जयंती निमित्त गुरुकुल आश्रमातील तसेच विद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना उपस्थितांकडुन शालेय गणवेश,शालेय साहित्य, वह्या,पेन यांचे वाटप करण्यात आले.रंगनाथ तासकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली.तसेच ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी सुरू केलेल्या गुरुकुल आश्रमाविषयी माहिती देऊन आश्रमाची पंचक्रोशीसाठी असलेली गरज व महत्त्व विशद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून ह.भ. प.शिंदे माऊली यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षण विषयक धोरण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, लोककल्याणकारी योजना, शिक्षण विषयी तळमळ, शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य या विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.प्राप्ती शिंदे व कु. साक्षी तासकर या विद्यार्थिनींनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.