आशाताई बच्छाव
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत यांची निवड
मालेगाव, प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर:- महिला व बालकांच्या जनकल्याणासाठी कार्यरत असलेल्या आणि पोलिस सुरक्षा व माहिती अधिकार कायदा संरक्षण वाढीसाठी सक्रीय असणाऱ्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी येथील आंशूराज राजेंद्र पाटील राऊत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या आंशूराज पाटील राऊत यांचे शिक्षण पदवी पर्यंत झालेले असून,जय शिवराय ग्रुप मालेगाव कॅम्प या सामाजिक व सेवाभावी प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांच्या फोरमच्या युवा संचालकपदी झालेल्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचे आंशूराज पाटील राऊत हे चिरंजीव आहेत.