आशाताई बच्छाव
कार्यवाहीत सावत्रपणा! कोणी पैसा खाल्ला? धाड बसस्थानक परिसरात बुलडोझर चालला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-धाड अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली तर पारदर्शीपणाने राबवायला हवी! श्रीमंत असो वा गरीब बेकायदेशीर अतिक्रमण निर्मूलन झाले पाहिजे. परंतू धाड बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा बुलडोझर केवळ गरिबांचे नुकसान करून गेल्याने आता त्यांच्या रोजी रोजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये श्रीमंतांना बगल देण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात संताप व्यक्त होत आहे.
धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धामणगाव रस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहीमेत १८ मे रोजी अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेवून तुघलकी पध्दतीने जेसीबीद्वारे अतिक्रमण काढणे सुरू केले. या प्रकारामुळे गोरगरीब व्यापाऱ्यांच्या दुकानातील सहित्याची नासधूस झाली.
प्रशासनाच्या या वर्तवणुकीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. धाड मध्ये चौकापासून ते बस स्थानक रस्त्यावर बाजरपेठे आहे. स्थानिक व्यापाऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा पक्के व स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये दुकाने आहे. बसस्थानक परिसरात काही व्यापारी
अतिक्रमणमध्ये दुकान थाटून बसले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यापुर्वी सबंधीत अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती. मात्र १८ मे रोजी व्यापाऱ्यांना कुठलीही सुचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिपक चिंचोले व पथक अतिक्रमण कार्यवाहीसाठी पोहचले. या कार्यवाहीत मात्र सावत्रपणा दिसून आला. या रस्त्यावर दुतर्फा दुकाने असताना एक लाईनमधील पक्के बांधकाम असलेल्या काही दुकानाचे अतिक्रमण वाचवण्यासाठी दुसऱ्या
लाईन मधील टीनपत्राच्या असलेल्या दुकानामध्ये मोजमाप करतांना रस्त्याचा मध्य हा काही मीटरने कच्च्या दुकानाकडे सरकविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक व्यापारी यांनी संबधीत उपविभागीय अभियंता यांना विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर देवून अधिकारी पसार झाले. व्यापारी आपल्या दुकानासमोरील पत्रे काढत असतांना सुध्दा जेसीबीची द्वारे दुकान पाडण्याचे काम करण्यात आले. यामुळे साहित्याचे नुकसान झाले. काही व्यापाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक मिळल्यामुळे या कार्यवाहीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान आमच्या वर अन्याय करीत रस्त्याचे मोजमाप चुकीच्या पध्दतीने करण्यात आले. यामध्ये राजकीय तंत्राचा वापर करण्यात आल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
बीडीसीसी बँकेच्या कॉम्प्लेक्स खेटून आहे नाली !सदर रस्त्यावर बीडीसीसी बँकेच्या वतीने कॉम्प्लेक्स बांधकाम करण्यात आलेले असून
त्यांच्या हद्दी बाहेर बांधकाम विभागाची जुनी नाली असून नालीवर ओटे तयार करण्यात आलेले आहे. कार्यवाहीच्या वेळी वास्तविक पाहता विभागाकडून बस स्थानक समोरील गाळ्याला खेटून आलेली हद्द ही चौकात असलेल्या गाळ्या जवळ 10 फूट बाजूला करण्यात आली. रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी विभागाकडून हद्द कायम करणे अपेक्षित होते परंतु ठेकेदाराने बँकेच्या गाळ्याकडून डॉ. तातेड यांच्या रुग्णालयापासून ते कोहिनूर इलेक्ट्रिक पर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण केला. सदर रस्त्याचे बांधकाम करतांना ठेकेदाराने रस्ता हा कोहिनूर इलेक्ट्रिक जवळ रस्त्याचे तोंड हे कमीत कमी दहा फूट पक्क्या दुकानाकडून कच्च्या टीनपत्राच्या दुकानाकडे केल्याने गरीब दुकानदाराकडे सरकवल्याने रस्त्याचा मध्य हा सरकला. त्यामुळे पहिल्या मोजणीत दुकाना बाहेर आलेले माप आता दुकानाच्या आत आले. याप्रकारामुळे टपरीधारकामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाचे हित संबंध व दबावामुळे तर झाले नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.