आशाताई बच्छाव
भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
सर्व देशप्रेमी नागरिकांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांचे आवाहन
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : – ऑपरेशन सिंदूर राबविणाऱ्या भारतीय सैन्य दलाला समर्थन देण्यासाठी देशाच्या सीमांवर भारतीय सैनिकांनी दाखवलेला पराक्रम, त्याग व शौर्य यांचा सन्मान व मनोधैर्य वाढविण्यासाठी दिनांक १८ मे २०२५ रोजी सकाळी 9.00 वाजता भव्य तिरंगा रॅली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि तिरंगा पदयात्रा जनार्धन मामा चौक जालना येथून सुरु होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-टांगा स्टैन्ड् ते बडी सडक येथील श्री राम मंदिराजवळ समारोप होणार आहे. यावेळी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर आणि बहिणी-मुलींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक कठोर निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आणि आमच्या सैन्याने पाकव्याप्त प्रदेशातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आणि त्यांना पूर्णपणे नष्ट केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय सशस्त्र दलांच्या धैर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे.
सदरील भव्य तिरंगा रॅली पदयात्रेस सर्व देशप्रेमी, नागरिकांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.