Home कोल्हापूर डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

32
0

आशाताई बच्छाव

1001510017.jpg

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ-  जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॉम्प्युटर,आय.टी.व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागामधील आठ विद्यार्थ्यांची प्रोमॅक्सिस सॉफ्टवेअर सोल्युशन व विप्रो पारी प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली .
निवड झालेल्यां विद्यार्थ्यांच्यामध्ये कॉम्प्युटर विभागाच्या शर्वरी कुलकर्णी, ताहुरा शेख, आय.टी. विभागाच्या श्रेयश देशमाने, अभिषेक मगदूम, श्रेया माने, इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या राधेय पेंडूरकर, श्वेता जाधव, व दक्षा निकम आहेत.
ए.आय, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळे हे शक्य होते असे मत प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केले.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे, विभाग प्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here