Home बुलढाणा घरकुलाच्या अडथळ्यावरून गजानन लहासे यांचा बावनबिर ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा इशारा..

घरकुलाच्या अडथळ्यावरून गजानन लहासे यांचा बावनबिर ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा इशारा..

104

आशाताई बच्छाव

1001510025.jpg

घरकुलाच्या अडथळ्यावरून गजानन लहासे यांचा बावनबिर ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा इशारा..

सहसंपादक स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज
संग्रामपूर :- तालुक्यातील ग्रामपंचायत बावनबीर
गावातील घरकुलाच्या जागेच्या अडथळ्यावरून बावनबीर येथील रहिवासी गजानन विश्वनाथ लहासे यांनी येत्या 21 मे 2025 पासून ग्रामपंचायत कार्यालय, बावनबीर समोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

त्यांनी यासंदर्भात 16 मे रोजी पंचायत समिती, संग्रामपूर कार्यालयात निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, 8 एप्रिल 2025 रोजी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लहासे यांची 25×15 चौ. मी. जागा मोजून निश्चित करून दिली होती.

मात्र, शेजारील काही व्यक्तींनी त्या जागेची मोजणी केलेल्या लोखंडी असणाऱ्या व खूट्या नासधूस केल्या याबाबत 8 मे रोजी सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

त्यानंतर 6 मे रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देऊनही सरपंच गजानन मनसुटे आणि ग्रामसेवक कार्यालयात अनुपस्थित राहून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात असंही नमूद आहे की, 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामपंचायतीने लहासे यांच्या जागेवरील पान टपरी हटवण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, आजतागायत ती टपरी जागेवरून हटवली गेलेली नाही.
उलट सरपंच अतिक्रमणधारकास पाठिशी घालत असल्याचा आरोप लहासे यांनी केला आहे.

सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कामचुकारपणामुळे गजानन लहासे यांच्या कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे,

असंही त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला असून, योग्य ती कारवाई न झाल्यास 21 मे पासून कुटुंबासह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा लहासे यांनी दिला आहे.

 

लहासे यांनी केलेल्या मागण्यां

1. ग्रामसेवक स्तरावरून पोलिसांना पत्र व पंचनामा आणि पोस्ट पावती पाठवावी.

2. जागेची पुन्हा मोजणी करून ती निश्चित करावी.

3. अडथळा निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.

4. घेतलेल्या ठरावानुसार पान टपरीचा खोका तात्काळ हटवावा

Previous articleडॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
Next articleएमबीए व एमसीए अभ्यासक्रमास चोपडा महाविद्यालयात मान्यता: अँड संदीप पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.