Home कोल्हापूर निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान…

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान…

267

आशाताई बच्छाव

1001548582.jpg

 

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान…
कोल्हापूर ( प्रतिनिधी अविनाश शेलार कडून) … … … .. …
शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपन्न झाला.

यावेळी वंध्यत्व निवारणासाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनानुसार अमूल्य व भरीव असे कार्य कोणतेही मानधन न घेता करणाऱ्या सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा विवेकराव पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, रानू महाराज वास्कर, मा. आमदार सुजित मिणचेकर, डॉ ज्योति वाघमारे, सुजित चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. वंध्यत्व निवारणासाठी त्यांनी स्वामीजींच्या प्रेरणेने भारतातील पहिले ट्रस्ट श्रेणीतील आय व्ही एफ टेस्ट ट्युब बेबी सेंटर कार्यान्वित केल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे वात्सल्य सुखा पासून वंचित राहू नये यासाठी डॉ. वर्षा पाटील ह्या विशेष परिश्रम घेत आहेत. अत्यंत माफक दरात त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. डॉ. वर्षा पाटील यांनी दिलेल्या विनामोबदला सेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरला आहे.

या कार्यक्रमास मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, रामहरी राऊत व पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नामांकित डॉक्टर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजागतिक तंबाखू नकार दिन : 31 मे
Next articleअमरावती कॅम्प मधून१०.४३लाखाचा गुटखा जप्त गुन्हे शाखा युनिट ची कारवाई व्यापारी अटकेत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.