Home जालना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून गणेशराव रत्नपारखे यांना...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून गणेशराव रत्नपारखे यांना वाहिली श्रध्दांजली

110

आशाताई बच्छाव

1001508251.jpg

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून गणेशराव रत्नपारखे यांना वाहिली श्रध्दांजली

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारा नेता गेल्याने मोठे नुकसान : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे नेते होते, आज ते या जगाचा निरोप घेऊन गेलेत. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. गुरुवार दि. 15 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी गणेशराव रत्नपारखे यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शोक सभेला उपस्थिती लावून आपल्या भावना व्यक्त केल्या.
गणेशीराव रत्नपारखे हा नेता जिल्हाध्यक्ष पद सोडायला तयार नव्हता आणि आम्ही देखील त्यांना सोडायला तयार नव्हतो, त्यांचे पक्षाचे गणीत अत्यंत चांगले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या सारखे इतर कोणतेही नेते दिसत नाहीत, ते आमचे अत्यंत लाडके नेते होते. अशा भावना त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून देखील व्यक्त केल्या. ते कधीच भाषणाच्या लफढ्यात पडत नव्हते, परंतु, जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच धडपड करीत होते. व्यवसाय, कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असतांनाही त्यांनी पक्षाची मोठी जबाबदारी देखील सांभाळली. अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण आणि त्यांची जोडी एकदम चांगली होती. माझ्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे, मात्र गणेशराव रत्नपारखे यांचे मोठे योगदान आहे असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Previous articleधावडा येथे छत्रपती संभाजी महाराजाची जयंती उत्साहात साजरी
Next articleनैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.