Home जालना धावडा येथे छत्रपती संभाजी महाराजाची जयंती उत्साहात साजरी

धावडा येथे छत्रपती संभाजी महाराजाची जयंती उत्साहात साजरी

114

आशाताई बच्छाव

1001508230.jpg

धावडा येथे छत्रपती संभाजी महाराजाची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १५/०५/२०२५
भोकरदन तालुक्यातील धावडा येथे 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान व गावकऱ्यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून येथील सर्व समाजातील नागरिकांनी व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले . सायंकाळी शीव प्रेमींनी व ग्रामस्थानी छत्रपती संभाजी महाराज की जय हो अशा जोरदार घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात गावातून रथावरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व समाजातील तरुण व ग्रामस्थ या जयंती उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी सर्वश्री प्रतीष्ठीत पदाधिकारी उपसरपंच ईकबाल पठाण, रा. से. संघाचे
विलास काका देशपांडे, माजी सरपंच बेलाअप्पा पिसोळे, माजी उपसरपंच जुमान चाऊस,नानासाहेब देशमुख,जयराम टेंभरे,डाॅ.आकाश आहेर,डाॅ.संजय जोशी,डाॅ.आकाश पालोदकर,लक्ष्मण वैरी,संतोष इंगळे,भाऊलाल वैरी,किशोर वाघ,विलास बोराडे,शिवाजी मोकासरे,दिनेश देवकर,विकास गावंडे,डाॅ विजय फिरके,शैलेश देशमुख, आराफत पठाण, सय्यद हफिज, शेख फैजान, शेख समद, संभाजी जाधव, तुकाराम बोराडे, माणिक सुरसे,यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.
समाज प्रबोधन करुण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रतिष्ठानचे शीवप्रेमी सर्वश्री संदिप टेंभरे,अजित दादा मोरे,किरण चंडोल,विकास सुडके,धिरज मोकासरे,कुणाल जाधव,गजानन सपकाळ,शुभम देवकर,शैलेश रोकडे,आकाश धनवई,गणेश सुडके,आर्जुन मोकासरे,रुषिकेश कोथलकर,मोतीलाल वैरी, अक्षय जाधव,शुभम देशमुख,गजानन धनवई,सुरज फुसे,सचिन धनवई, यानी मोठे परिश्रम घेऊन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शेवटी येथील सरपंच सौ गंगुबाई बोराडे व त्यांचे पती तुकाराम बोराडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून आरती करण्यात आली .समारोप यावेळी धावडा येथील शिवभक्त,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .