Home जालना नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत

95

आशाताई बच्छाव

1001508273.jpg

 

 

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

जालना, दि.15(जिमाका): आगामी मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते. यावेळी बैठकीस प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडीक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर यांची प्रमुख उपस्थिी होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करावे. तसेच  मान्सुनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहावे. अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुठे अशी घटना घडल्याचे कळताच तात्काळ मदत पोहोचेल या पध्दतीने नियोजन करावे. घटनेचा पंचनामा तातडीने करुन त्याचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर करावा, जेणेकरुन वेळेत आर्थिक मदत देणे शक्य होईल. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा व नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. मान्सुन काळात जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आपत्तीच्या कामात निष्काजीपणा करु नये. यात दोषी आढळल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.