Home उतर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट!

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट!

54
0

आशाताई बच्छाव

1001508160.jpg

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट!
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- आज छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले साहेब यांना भेटून राज्यातील ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी खालील मागण्या मांडण्यात आल्या:
1️⃣ गायरान जमिनीचे नियमन: 2010 पर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनी रेगुलर करून सातबारा द्यावा. भूमिहीनांना जमीन वाटप करावे.
2️⃣ सौर ऊर्जा प्रकल्पांना आळा: मागासवर्गीय, दलित, आदिवासींच्या ताब्यातील गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी हिसकावल्या जात आहेत. ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी.
3️⃣ सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र बजेट: सामाजिक न्याय विभागाचा 8,000 कोटी आणि 410 कोटी रुपये लाडली बहिण योजनेसाठी वळवले जात आहेत. यावर रोख लावण्यासाठी स्वतंत्र बजेट कायदा करावा.
4️⃣ महाबोधी बुद्धविहारावरील हल्ल्याची दखल: महाबोधी बुद्धविहार येथे भंतेजी व महिलांवर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी.
5️⃣ दलित अत्याचार थांबवा: राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. बारामती येथे दहावीत शिकणाऱ्या दलित मुलीची छेड काढल्याने तिने आत्महत्या केली. बीड येथील साक्षी कांबळे प्रकरण गंभीर आहे. दलित अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
6️⃣ सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी कारवाई: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून सरकारने गुन्हा दाखल करावा.
7️⃣ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन: नव्याने निर्माण झालेल्या झोपडपट्ट्या कायम करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
8️⃣ आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना: बंद केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन निधी योजना पुन्हा सुरू करावी.
9️⃣ महात्मा फुले महामंडळाच्या फायली: महामंडळाच्या प्रलंबित फायली तात्काळ निकाली काढाव्यात.

यावेळी सामाजिक चळवळी युवा नेते दीपक केदारे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मा. बाबुराव कदम, महाराष्ट्र प्रवक्ते मा. बंटीदादा सदाशिवे, जिल्हा उपाध्यक्ष मा. संदीप गंगावणे उपस्थित होते.

सामाजिक न्यायासाठी लढा सुरूच राहील!
सामाजिकन्याय

Previous articleमालेगाव तालुक्यांतून ग्रामसेवकांच्या बदल्या,”कही खुशी तो कही गम”
Next articleशाळा बंद करणारा15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here