Home उतर महाराष्ट्र तेरा कोटी पंच्याहत्तर लाख, एकेचाळीस हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, श्रीरामपूर...

तेरा कोटी पंच्याहत्तर लाख, एकेचाळीस हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

223

आशाताई बच्छाव

1001506792.jpg

 

तेरा कोटी पंच्याहत्तर लाख, एकेचाळीस हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
——————————-
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- दिनांक 14/05/2025 रोजी 17.00 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे साो. यांना गोपनीय बातमी मिळाली की, श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात एका छोटा हत्ती टेम्पो मधुन अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे. सदर प्रकरणी खात्री करुन पुढील कार्यवाही करा असे कळविल्यावरुन पोनि. नितीन देशमुख साो. श्रीरामपूर शहर पो. स्टे यांनी तात्काळ पोलीस पथक व पंचासह एमआयडीसी परिसरात पोहचुन एमआयडीसी परिसर व आजुबाजुच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असतांना दिघी खंडाळा रोडवर एक क्रिम रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्र. एम एच 20 बीटी 0951 असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येतांना दिसला. तेव्हा सदर टेम्पोला थांबवून सदर वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे त्याचे नाव मिनीनाथ विष्णु राशीनकर, वय 38 वर्षे, रा. धनगरवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी वाहनचालक मिनीनाथ राशीनकर व त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या दिसुन आल्या त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरीत 7 गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक दिसुन आले. सदर वाहनचालक मिनीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असुन गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांशी संपर्क साधुन ते घटनास्थळी हजर होवनु त्यांनी वरील टाटा टेम्पो मधील गोण्यांमधील स्फटीक व पावडर यांचे निरीक्षण करुन प्रथमदर्शनी सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम हा अंमलीपदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने सदरचा खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1) 6,97,67,000 रु.कि.चे 07 गोण्यामध्ये 69.767 कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम चे स्फटिक (क्रिस्टल)
2) 6,76,74,000 रु. कि.चे 14 गोण्यामध्ये 338.37 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर
3) 1,00,000/- रु.कि.ची टाटा एस कंपनीचा छोटा हाती MH 20 BT 0951 या नंबरचा जुवाकिअं.
13,75,41,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर मुद्देमालाबाबत आरोपीकडे विचारणा करता त्याने सदरचा माल विश्वानाथ कारभारी शिपनकर रा. दौड, जि. पुणे याने दिला असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने व आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायीक वापराकरीता मोठ्या प्रमाणावर मिळुन आल्याने आरोपी
नामे 1) मिनीनाथ विष्णु राशीनकर, वय 38 वर्षे, रा. धनगरवाडी ता. राहता जि. अहिल्यानगर 2)
विश्वनाथ कारभारी शिपणकर रा. दौड जि.पुणे याने एम.आय.डी.सी. श्रीरामपूर यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 499/2025 एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 22(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात आरोपी क्रं.01) मिनीनाथ विष्णु राशीनकर याला अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस, उपनिरीक्षक / रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक / दिपक मेढे, पोना/किशोर औताडे, पोना/सोमनाथ मुंडले, पोकों/संपत बडे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/ अमोल पडोळे, पोकों/अजित पटारे, पोकों/अकबर पठाण, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/राहुल पौळ, पोकॉ रमेश रोकडे, पोकों/ झिने, सफौ. चालक/राजेश सुर्यवंशी, पोकांचा/बाळासाहेब गिरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोकों / नितीन चव्हाण, पोकों/ रविंद्र बोडखे, पोकों/ अमोल नागले. पोकॉ/ नितीन शिरसाठ, चालक पोकों/दिलीप कुऱ्हाडे मपोकों/अश्वीनी पवार यांनी केली.

Previous articleपाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू.
Next articleपुण्यात कोयदा गँगची दहशत; दत्तवाडी परिसरात भर दुपारी तरुणावर हल्ला, घटना CCTVत कैद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.