आशाताई बच्छाव
वैद्यकीय विद्यार्थ्यांची गोदावरी नदीपात्रात आत्महत्या
नांदेड :- प्रतिनिधी शिवाजी धुमाळे
दि. 15 रोजी श्री गुरुगोविंद मेमोरीयल स्कूल ऑफ नर्सिंग महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने हस्सापूर पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आज त्याचा मृतदेह सापडला आहे सदरील युवक हा दोन दिवसापासून बेपत्ता होता असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी महाविद्यालयच्या व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार केली आहे. पुनीत विनोद वाटकर वय वर्ष (22) रा. अमरावती सध्या राहणार धनगरवाडी याचा मृतदेह आज गोदावरी नदीपात्रात सापडला आहे त्याने दोन दिवसापूर्वी नदीपात्रात उडी मारल्याची माहिती प्राप्त झाली आहे पुनीत वाटकरच्या मृत्युंसंदर्भाची सर्व कायदेशीर प्रक्रिया वजीराबाद पोलीस ठाणे करीत आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुनीतच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय महाविद्यालयच्या व्यवस्थापनावर आक्षेप घेत त्यांच्या त्रासामुळेच पुनीतने आत्महत्या केली आहे असा आरोप करीत जाब विचारला आहे प्रॅक्टिकल पूर्ण न झाल्यामुळे महिला प्राध्यापक यांनी त्याला त्रास दिला पुनीतला कोणत्या महिला प्राध्यापकांनी त्रास दिला अशी विचारणा करीत आरोप कुटुंबियांनी केला आहे