आशाताई बच्छाव
- ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश, गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे नांदेड जिल्हा
येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अग्रक्रमावर असलेल्या ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. ब्राईट स्टारचे दोन विद्यार्थी बिरादार प्रथमेश ओंकार १०० टक्के व कु हर्षदा राजकुमार गरड 100 टक्के यांनी 100 टक्के गुण मिळवीले आहेत.
ह्या गुणवंत विद्यार्थयांसोबतच शाळेचा निकाल प्रतिवर्षा प्रमाणे 100 लागला आहे, 8 विद्यार्थी 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत, 13 विद्यार्थि 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही ब्राईट स्टारच्या
विद्यार्थीनी कु. स्नेहल मुत्तेपवार 100 टक्के, कु सुप्रिया येलगुंदे 100 टक्के, कु. शेख इफ्रा, कु. पुनम स्वामी यांनी 100 टक्के गुण मिळवून बोर्डात प्रथम
स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक नावलौकिकामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थी असे, बिरादार प्रथमेश १०० टक्के, गरड हर्षदा १०० टक्के, सय्यद सना ६६ टक्के, तांबोळी अमान ६७टक्के, बिरादार समीक्षा ६७टक्के, वीरकपाळे रोहिणी ६६ टक्के, कर्णे अथर्व ६६ टक्के, निवडगे नंदिनी ६५ टक्के, ढवळे दिव्या ६५टक्के, उत्कर संस्कृती ६३ टक्के, गणापूरे चौतन्य ६३ टक्के, मोरे अश्विनी ६२टक्के, कांबळे वैभव ६१ टक्के असे आहेत. या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचीव प्रा विरभद्र घाळे व प्रा सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे यांनी सर्व विद्यार्थयांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. शिक्षकवृंद यांच्या परिश्रमांचेही कौतुक करून आगामी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






