Home जालना माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचा इ.10 वी...

माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचा इ.10 वी च्या निकाला मध्ये घवघवीत यश

246

आशाताई बच्छाव

1001506848.jpg

माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचा इ.10 वी च्या निकाला मध्ये घवघवीत यश

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दि. 13 मे 2025 रोजी लागलेल्या इयत्ता 10 वीच्या. निकालात येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा माहोरा ता. जाफ्राबाद येथील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली.यामध्ये
प्रथम -कु. अर्चना कारभारी बकाल (81.20%)
द्वितीय – कु. सरला नरसिंग गायकवाड (75.60%)
तृतीय – कु. पल्लवी संतोष साबळे (74.20%)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आणि इ. दहावीच्या निकालात मुलींचा दबदबा कायम ठेवला.
सर्व गुणवंत , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आपल्या देशाचे मा. केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे, मा. आमदार श्री संतोष पाटील दानवे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीप पाटील साबळे यांनी मनःपुर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वर्षी शाळेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली त्या बद्दल जि. प. सदस्य सौ. आशाताई पांडे यांनी मुलींचे विशेष कौतुक करून उज्जल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, तथा सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleकौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत – एससीडीएलच्या सिल्वर जुबली कार्यक्रमात मुक्ता अवचट – पुणतांबेकर यांचे विचार
Next articleमाहोरा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.