आशाताई बच्छाव
राधादेवी बाकलीवाल शाळेची 100 टक्के निकालची परंपरा कायम
वाशिम. गोपाल तिवारी ब्युरो चीफ –येथील श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनने दहावीच्या निकालात 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली असून शहरात प्रथम स्थान कायम ठेवले आहे.
शैक्षणिक सत्र 2025/26 च्या आज जाहीर झालेल्या निकालात वाशीम शहरातील श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनच्या समिक्षा अमोल बोळे हिने 95.80 टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रतिक्षा धाराजी सावळे हिने 94.20 टक्के गुण मिळवित तसेच अक्षरा गणेशसिंह ठाकुर हिने सुध्दा 94.20 टक्के गुण मिळवित संयुक्तपणे द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर कला संतोष गिते हिने 93.30 टक्के गुण मिळवित तृतीय तर श्रुतिका शिवाजी संगवार हिने 93 टक्के गुण मिळवित चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.
या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त, 19 विद्यार्थ्यांनी 89 ते टक्केपेक्षा जास्त, तर 20 विद्यार्थ्यांनी 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्री बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॳॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, व्यवस्थापक ॳॅड माणिकचंदजी बज, मुख्याध्यापक धनंजय वानखेडे, शिक्षक विनायक उज्जैनकर, मनिष सदाफळे, राम राठोड, मयुरी सावले, रोहिणी ठोके, रोशनी अंभोरे, ज्ञानेश्वर वाकुडकर, शुभम गोटे, मोहीनी अहाळे, संतोष फुरसुले, प्रफुल्ल काळे, लक्ष्मण भगिरथे, आकाश भागिरथे यांचेसह आपल्या आई वडीलांना दिले आहे.