Home बुलढाणा बुलडाणा :-मोताळा तालुक्यातील मागील २५ वर्षांपासून होते अतिक्रमण; वन हक्क दावे केले...

बुलडाणा :-मोताळा तालुक्यातील मागील २५ वर्षांपासून होते अतिक्रमण; वन हक्क दावे केले नामंजूर ?

112

आशाताई बच्छाव

1001501163.jpg

बुलडाणा :-मोताळा तालुक्यातील मागील २५ वर्षांपासून होते अतिक्रमण; वन हक्क दावे केले नामंजूर ?
मोताळा वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
येथील वन विभागाच्या जमिनीवर मागील जवळपास २५ वर्षांपासून केलेले अतिक्रमण वन विभागाच्या वतीने ९ मे पासून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अतिक्रमण निष्कासित करण्याच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुलडाणा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या मोताळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जवळपास ७२० हेक्टर वन जमिनीवर शेती काढून तसेच घरे बनवून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामध्ये मोताळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील खैरखेड, कोथळी, रोहिणखेड, दाभा, दादगाव, चिंचखेडनाथ, राजूर, मोहेगाव, सहस्रमुळी, माळेगाव, तरोडा, तारापूर, उबाळखेड, वडनेर भोलजी, गुळभेली या ठिकाणी वनजमिनीव
गुळभेली या ठिकाणी वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणावरील शेतीचे वन हक्क दावे बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी नामंजूर केलेले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार संबंधित अतिक्रमण धारकांच्या अतिक्रमण क्षेत्राबाबत सुनावण्या घेऊन संबंधितांना अतिक्रमित क्षेत्र सोडण्याबाबत नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार या क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासन करण्याची कार्यवाही ९ मे पासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या वतीने संयुक्तपणे सुरू आहे. या कारवाई मध्ये मुख्य वनसंरक्षक अमरावती
ज्योती बॅनर्जी, उपवन संरक्षक सरोज
गवस, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.एम.
काकडे यांच्या मार्गदर्शनात
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशीक
किशोर पडोळ यांच्या नेतृत्वात
बुलडाणा विभागाचे सर्व
वनकर्मचारी, अधिकारी सहभागी
झाले असून या कार्यवाहीला
नागरिकांनी सहकार्य करण्याचे
आवाहन वन विभागाच्या वतीने
काढण्यात आलेल्या पत्रकातून
करण्यात येत आहे.

Previous articleअभिमानास्पद ! ‘सिद्धी’ने कोकणकडा दरी उतरून कर्तुत्व केले सिद्ध ! – इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये विक्रमाची नोंद !
Next articleराधादेवी बाकलीवाल शाळेची 100 टक्के निकालची परंपरा कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.