आशाताई बच्छाव
युद्धात भारताच्या विजयासाठी आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी उत्तरेश्वर महादेवाला महाआरतीकरून साकडे कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा, जगभरात भारताबद्दल अनुकुलता निर्माण व्हावी आणि भारतीय सैन्य,नागरिक सुरक्षित रहावेत तसेच देशांतर्गत दहशतवादी वृत्तीच्या लोकांचाही मुळासकट नायनाट होऊन दहशतवाद कायमचा संपून रामराज्याची निर्मिती व्हावी यासाठी उत्तरेश्वर पेठेतील,उत्तरेश्वर महादेव मंदिरामध्ये उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ परिसरातील नागरिकांनी महाआरती करून महादेवाला साकडे घातले.
यावेळी बंडा साळुंखे दीपक काटकर रामदास काटकर किशोर घाटगे सुनिल पाटील प्रकाश गवंडी राजू माने विशाल शिराळे दिग्विजय कालेकर सुहास शिंदे अरुण तीबिले युवराज तोडकर सागर जाधव शिवाजी जाधव महेश ओतारी बंडा कदम शिवराज नायकवडे राजू मताडे यासह महिला तरुण मोठ्या संख्येने सहभागी होते.
____________________________________