आशाताई बच्छाव
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , विष्णुपुरी, येथे परिचारिका संघटनेच्या वतीने जागतिक परिचारिका दिन उत्साहत साजरा. नांदेड शिवाजी धुमाळे
दि. 12 मे 2025 रोजी अधिसेविका कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड ( विष्णुपुरी )अंतर्गत उत्सव समिती च्या माध्यमातून जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. 6-5-2025 रोजी पासून सुरु झालेल्या जागतिक परिचारिका सप्ताहची काल खऱ्या अर्थाने सांगता झाली.जागतिक परिचारिका दिन विशेष
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशमूख (अधिष्ठाता) प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार कापसे( वै.अधीक्षक)
रमाकांत पांचाळ ( पोलीस निरीक्षक, एटीएस,मुंबई) भीमराव चक्रे ( राज्य-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय -लातूर )
अल्का जाधव(अधिसेविका) प्रतिभा वाघदरीकर ( जिल्हाध्यक्ष म.रा.प. स. शाखा नांदेड) डॉ. शिवानंद (उप- वै. अधीक्षक) अर्चना मुंगल( संघटक. मरापस, नांदेड.)आढाव सिस्टर (परिसेविका)
शुभांगी कस्तुरे (का. सदस्य. मरापस, नांदेड) इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद चव्हाण यांनी केले.यावेळी स्वागतगीत मेघा सरपते व स्वाती इंगळे यांनी सादर केले प्रस्तावना भीमराव चक्रे यांनी केली प्रतिज्ञा अल्का जाधव यांनी केली. तसेच मनोगत रामाकांत पांचाळ,डॉ. विजयकुमार कापसे यांनी व्यक्त करत सर्वाना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरनाचे सूत्रसंचालन रवि शिसोदे यांनी केले.आभार प्रदर्शन सुधीपा उपाध्यया यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या सर्व पदाधिकारी वर्गानीं व तसेच ऊत्सव समितीच्या सर्व कार्यकारी सदस्यांनीं विशेष मेहनत घेतली तसेच जी. एम सी नांदेड च्या सर्व परिचारिका वर्गाचे विशेष आभार संयोजकानी मानले






