आशाताई बच्छाव
कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील श्री शंकराचार्य पीठाच्या उत्सवाची सांगता सोमवारी पालखी मिरवणुकीने झाली.
शंकराचार्य पीठाच्या उत्सवाची मिरवणुकीने सांगत
आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन
कोल्हापूर, ता. १२ अविनाश शेलार ब्युरो चीफ– येथील शंकराचार्य पीठाच्या उत्सवाची पालखी मिरवणुकीने उत्साहात आज सांगता झाली.
श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये ७ ते १२ मे या कालावधीत आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जन्मकाळ, कीर्तन, रामायण, हवन, भाव भक्तिगीते अशा विविध कार्यक्रमांबरोबर आयोजन तर दररोज होईलच याशिवाय देवतांना अभिषेक, गीताभाष्य, दशोपनिषद वाचन याचे आयोजन केले होते.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन पालखी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास पीठातून बाहेर पडली. पारंपरिक वाद्यांचा बाज जपत लवाजमासह पालखी शुक्रवार पेठ, गंगावेस, रंकाळा तालीम या मार्गाने ताराबाई रोडवरून अंबाबाई मंदिरात पोहचली. तेथे श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन परत महाद्वार रोडवरून पालखी पीठात आली. पालखी मार्गावर भाविकांनी स्वागत केले. दुपारी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भक्तांनी घेतला.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी केले. यावेळी सदस्य प्रसाद चिकसकर, धनंजय मालू, रामकृष्ण देशपांडे यांच्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.