आशाताई बच्छाव
वक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला
जालना प्रतिनिधी दिलीप बोंडे : वक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला ता.07 रोजी भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा चे प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्येकर्ताला भेटुन वक्फ बोर्ड संशोधन बिल चे फायदा आणि समर्थन का महत्वाचे आहे या विषयावर माहिती दिली व अल्पसंख्यक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जनतेला भेटुन वकफ बोर्ड संशोधन बिल किती महत्वाचे आहे हे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या.
या कार्येकर्मात भाजपा अल्पसंख्यक प्रदेश सचिव सिकंदर आलीसाहब, भाजपा अल्पसंख्यक महानगर अध्यक्ष सैयद इमरान अली, तसेच पदाधिकारी नूर लाला खान, सज्जाद काजी, जुनेद मिर्जा, नदीम कुरैशी, शमाबाजी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.