Home जालना मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

94

आशाताई बच्छाव

1001448813.jpg

मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ – प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशन द्वारे दरवर्षी 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्या भावनांचा एक आत्मिक संगम आहे. दरम्यान, संत निरंकारी ंमंडळातर्फे 24 एप्रिल हा दिव बाबा गुरुचनन संह महाराज यांच्या आठवणी प्रित्यर्थ मानव एकाता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. दरम्यान, जालना येथील गांधी चमन, रेल्वे स्टेशन रोडवरील निरंकारी मंडळातर्फेही मानव एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने भारतातच नव्हे तर दूरदेशातही महारक्तदान शिबीराचे निंरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन वतीने आयोजन करण्यात येते. मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो. जो नि:स्वार्थ सेवाभावनेच्या सामूहिक जागृतीचे स्वरूप बनून संपूर्ण वर्षभर समाजामध्ये प्रवाहित होत राहते. त्याचबरोबर सत्संग कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेम, शांती आणि समरसतेचा प्रकाशदेखील जनसामान्यांपर्यत पोहचविला जातो. हा दिवस या गोष्टीचे परिचायक आहे, की सेवा केवळ एक कार्य नसून निष्काम समर्पण व आत्मिक भावनेचे द्योतक आहे. यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे 500हून अधिक शाखांमध्ये भव्य यरक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली.

 

Previous articleतिसर्‍या राष्ट्रीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र संघाची विजयाची हॅट्रीक
Next articleविहिरी व घरकुलांच्या मंजुरी साठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्याना सोडणार नाही.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.