Home जळगाव विहिरी व घरकुलांच्या मंजुरी साठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्याना सोडणार नाही.

विहिरी व घरकुलांच्या मंजुरी साठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्याना सोडणार नाही.

228

आशाताई बच्छाव

1001451259.jpg

विहिरी व घरकुलांच्या मंजुरी साठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्याना सोडणार नाही.

– संतप्त आमदार मंगेश चव्हाण यांची पंचायत समिती व पोलीस स्टेशनला धडक

 

चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यात मोठ्या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र पंचायत समिती मधील रोहयो विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये लाच घेऊन आपल्या तुंबड्या भरल्या असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत होत्या. एव्हडे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर आज काही शेतकरी माझ्याकडे तक्रारी घेऊन आले असता मी स्वतः शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कानउघाडणी केली. गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समिती मध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे त्यांना सांगितले.

त्यानंतर तेथे उपस्थित शेतकऱ्यांसह तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समिती मधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात रीतसर तक्रार दिली आहे.

माझी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना विनंती आहे की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरी साठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात आपली तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी – कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

– आमदार मंगेश रमेश चव्हाण

Previous articleमानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प
Next articleमाहुरवेश मैदानात गुंड प्रवृत्तींचा धुमाकूळ; नागरीक त्रस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.