Home जालना तिसर्‍या राष्ट्रीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र संघाची विजयाची हॅट्रीक

तिसर्‍या राष्ट्रीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र संघाची विजयाची हॅट्रीक

106

आशाताई बच्छाव

1001448799.jpg

तिसर्‍या राष्ट्रीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र संघाची विजयाची हॅट्रीक
जालना/प्रतिनीधी दिलीप बोंडे- फेंटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व राजस्थान फेंटबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजीत तिसर्‍या राष्ट्रीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2024 -25 सेंट लॉरेन्स पब्लीक स्कुल, जैतपुरा, जयपुर राजस्थान या ठिकाणी दि. 18 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान उत्साहात संपन्न झाल्या.
सदर राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातुन सात राज्यांचे जवळपास 150 ते 200 खेळाडु, पंच व तांत्रीक अधिकारी सहभागी झाले होते. स्पर्धेत सातत्यपुर्ण कामगीरी करत महाराष्ट्राचा संघ अजिंक्य राहीला,  तर यजमान राजस्थानला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. पंजाब व उत्तरप्रदेश संघाना कामगीरीच्या आधारावर तिसरे स्थान विभागुन देण्यात आले तर उत्तराखंड संघ चौथ्या स्थानावर राहीला.
स्पर्धेचे उद्घाटन सेंट लॉरेन्स पब्लीक स्कुलचे संचालक डॉ. दिग्वीजय सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजस्थान फेंटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कुमार चौधरी हे होते. यावेळी मंचावर फेंटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया चे महासचिव शेख चाँद पी.जे., निरीक्षक शेख अहेमद, राजस्थानचे सचिव राजेंद्र योगी, शाळेच्या मुुख्याध्यापीका श्रीमती सिंग मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना डॉ. दिग्वीजय सिंग यांनी खेळाडुंना शुभेच्छा देवुन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जयपुर येथे आयोजीत करण्याची ईच्छा व्यक्त करत फेंटबॉल खेळाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहिर केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी फेंटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खुशालसिंग राणा ठाकुर यांनी भ्रमणध्वनी वरून उपस्थित सर्व खेळाडु, पंच व तांत्रीक अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleपक्ष संघटनेची मजबूत बांधणी करा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Next articleमानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्प
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.