Home जालना लोकशाही दिनात अधिकाऱ्यांनी केली नागरिकांची दिशाभूल जनतेचे प्रश्न जैसे थे -कृष्णा लहाने...

लोकशाही दिनात अधिकाऱ्यांनी केली नागरिकांची दिशाभूल जनतेचे प्रश्न जैसे थे -कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसंस

120

आशाताई बच्छाव

1001409436.jpg

लोकशाही दिनात अधिकाऱ्यांनी केली नागरिकांची दिशाभूल जनतेचे प्रश्न जैसे थे -कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसंस
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १३/०४/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की, लोकशाही दिनात जिल्ह्यातील इतर अधिकारी हे मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे कुठलेच आदेश मानत नाहीत याचा प्रत्यय दिनांक ०७/०४/२०२५रोजी आयोजित लोकशाही दिनालाच आला असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष मा.कृष्णा यांनी दिली आहे.गेल्या दोन वर्षापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने हे संपादित केलेल्या क्षेत्रातील जमिनी खरेदी विक्री करून खोदलेल्या विहिरी बुजवण्याबाबत तक्रार ही मा.उपविभागीय जलसंधारण लघुपाटबंधारे विभाग भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील जमीन खरेदी विक्री करून खोदलेल्या विहिरी बुजवण्याबाबत तक्रार दिली असता मा. श्री एस एम गुंठे शासकीय अभियंता भोकरदन यांनी तक्रारीदरम्यान पंचनामा करून सदरील विहिरी या गट नंबर ६९ म्हसरूळ शिवार मध्ये सलाम खा बशीर खा पठाण व बुढन बशीर खा पठाण याने मनसुब रामराव लहाने म्हसरूळ व संदीप हरिचंद्र साळवे चिंचखेडा या दोघांना संपादित क्षेत्रातील जमीन विहिरी खोदण्यासाठी विकल्या संबंधित जमीन ही संपादित क्षेत्रातील असून खरेदी विक्री केली त्यानंतर अभियंता गुंठे साहेब यांनी पंचनामा करून सदरील जमिनी संपादित क्षेत्रातील असून त्या बुजवण्यात याव्यात असा पंचनामा केला असून त्यानंतर गुंठे साहेब सेवानिवृत्त झाल्याने हे प्रकरण रेंगाळले त्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने यांनी लोकशाही दिनात आपली तक्रार दाखल केली परंतु अनेक महिने वाऱ्या करून दोन ते तीन वर्षे उलटले न्याय भेटत नव्हता आणि दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सोमवारी मा. जिल्हाधिकारी साहेबांना भेटून तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्याकडे सही करून जिल्हा अधिकारी साहेबांनी जाण्याचे सांगितले. व श्री कृष्णा लहाने हे संबंधित अधिकारी सरिता सूत्राने उपजिल्हा अधिकारी भूसंपादन यांच्याकडे गेले असता त्या मॅडमनी सांगितले की तुम्ही संबंधित तक्रार मा. उपविभागीय जलसंधारण लघुपाटबंधारे विभाग भोकरदन यांच्याकडे द्या कारण माझ्याकडून तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार नाही अशा प्रकारे उत्तर मिळाले असल्याचे श्रीकृष्णा लहाने यांनी सांगितले आहे.

Previous articleअड्याळच्या घोडा यात्रेला जत्रेचे स्वरूप घोडा यात्रा पाहण्याकरिता विदर्भातील नागरिकांची गर्दी
Next articleपातोंडा येथील दरोडा प्रकरणी परभणीची चौकडी जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.