आशाताई बच्छाव
पातोंडा येथील दरोडा प्रकरणी परभणीची चौकडी जेरबंद
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील पातोंडा येथे उघड्या घरात घुसून वृद्धेला दमबाजी करत सुमारे 42 हजार रूपयांचा ऐवज लंपास करून पोबारा करणार्या परभणी जिल्ह्यातील चौघांच्या मुसक्या चाळीसगाव शहर पोलीसांनी आवळल्या.गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 12 तासात पोलीसांनी आरोपींना अटक केली.
पातोंडा ता.चाळीसगाव येथील अनुसया रघुनाथ माळी(60) यांचे रहाते उघड्या घरात प्रवेश करुन अज्ञात आरोपीतांनी त्यांना दमबाजी करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटुन नेला होता. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व पोलीस पथकाने घटनास्थळी जावून माहिती घेतली व तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर शहरातील धुळे रोडवरील डेराबर्डी भागात झोपड्या टाकून राहणार्या काही जणांवर पोलीसांचा संशय बळावला. तपासात पोलीसांना परभणी जिल्ह्यातील काही जणांनी डेरा टाकल्याचे कळाले. पोलीसांनी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली.
पातांेंड्यातील जबरी लुट अमोल कडबा भोसरे(20), शरद सुधाकर चव्हाण(20), सुधिर मल्लप्पा चव्हाण (20 व पाहीजे आरोपी अभिशेख भोसले सर्व रा. मगंरुळ तांडा ता.जितूर जि. परभणी आणि एक विधीसंघर्षीत बालक अश्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यातील एका विधिसंघर्ष बालकास बाल न्याय मंडळ यांचे कडेस हजर करून सुधारणागृहात रवानगी केली. तर उर्वरीत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील लुटलेल्या माला पैकी 78 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,उप निरीक्षक संदिप घुले, पोहेकॉ अजय पाटील, राकेश पाटील, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विजय पाटील, नरेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली.
या आरोपीतांकडे अधिक चौकशी असता चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला दाखल कलम 305,331(4) हा गुन्हा देखिल उघडकीस आला. या गुन्हयातील 25 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागीने या आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आल्याची माहीती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकार परिषदेत देवून कमी वेळेत गुन्ह्याचा शोध लावल्याबद्दल शहर पोलीसांचे कौतुक केले.






