Home भंडारा अड्याळच्या घोडा यात्रेला जत्रेचे स्वरूप घोडा यात्रा पाहण्याकरिता विदर्भातील नागरिकांची गर्दी

अड्याळच्या घोडा यात्रेला जत्रेचे स्वरूप घोडा यात्रा पाहण्याकरिता विदर्भातील नागरिकांची गर्दी

149

आशाताई बच्छाव

1001409419.jpg

अड्याळच्या घोडा यात्रेला जत्रेचे स्वरूप
घोडा यात्रा पाहण्याकरिता विदर्भातील नागरिकांची गर्दी

संजीव भांबोरे
भंडारा- पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दरवर्षीप्रमाणे रामनवमीनिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या भागवत सप्ताह निमित्त घोडा रथाचे सुद्धा आयोजन करण्यात येत असते.या घोडा रथयात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे झुले घोडा यात्रेत येत असतात .ते पाहण्याकरिता व झुल्यांचा आनंद घेण्याकरिता लाखो लोकांची गर्दी या ठिकाणी होत असते. त्याचप्रमाणे हनुमान जयंती निमित्त सार्वजनिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या विवाह सोहळ्यात लाखो नागरिक जेवणाचा आस्वाद घेत असतात. या घोडा जत्रेत वेगवेगळ्या झुल्यांसोबत मौत का कुआ हे सुद्धा विशेष आकर्षणाचे केंद्र असते.