आशाताई बच्छाव
उमरगा कृषी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार – बाळासाहेब माने उमरगा प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील कृषी कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निवेदन दि.८/०४/२५ रोजी तालुका कृषी कार्यालयात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात असे म्हटले आहे की, उमरगा तालुका कृषी कार्यालयात बी-बीयाणे , खते आणि औषधे यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहे.तालुका कृषी कार्यालया अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कार्यालया अंतर्गत विविध योजना राबविल्या गेल्या असता यामध्ये केंद्रीय माहिती अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागितली असता खोटी आणि अर्धवट माहिती देण्यात आलेली आहे. बी-बीयाणे , खते,औषधे यामध्ये मोठ्या प्रमाणात अपराधफर झाल्याचे दिसून येत आहे. किटची माहिती मागितली असता कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. कृषी सहाय्यक एस.बी.आरीकर यांनी दाबका, मुळज येथे कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केलेले आहे ,काही व्यक्तींना हाताशी धरुण बी -बियाणे आपल्या मर्जीतील व्यक्तींना दिलेले आहेत. तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी बी- बियाणे, खते आणि औषधे यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे दिसून येत आहे. दिनांक 15 /5 /2022 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे दाबका, मुळज, कदमापूर, एकोंडीवाडी येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असताना आंदोलन मोडीत काढण्याचे काम आरीकर यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी कुठलाही पंचनामा न करता एकाच शेतकऱ्याचा पंचनामा केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी व कृषी सहाय्यक एस .बी .आरीकर यांना निलंबित करण्यात यावे.जे जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी अन्यथा आठ दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने ,तालुकाध्यक्ष महावीर पाटील यांच्या सह्याआहेत.






