Home जालना पारध बु येथे महादेवाच्या स्वारी निमित्त ह भ प मोनिकाताई महाराज खाडे...

पारध बु येथे महादेवाच्या स्वारी निमित्त ह भ प मोनिकाताई महाराज खाडे आळंदी यांचे भव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

119

आशाताई बच्छाव

1001396001.jpg

पारध बु येथे महादेवाच्या स्वारी निमित्त ह भ प मोनिकाताई महाराज खाडे आळंदी यांचे भव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे साला बादाप्रमाणे चैत्र पौर्णिमा या दिवशी महादेवाची स्वारी निघते या स्वारीच्या निमित्ताने पाराशर संस्थान या ठिकाणी गावकऱ्यांसाठी रवी सर लोखंडे नवभारत युवा प्रतिष्ठान पारध यांच्या वतीने ह भ प मोनिकाताई खाडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्यावेळी नवभारत प्रतिष्ठानच्या वतीने ह भ प मोनिकाताई यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोनिकाताई खाडे यांनी नागरिकांना साधुसंत कीर्तनाच्या माध्यमातून कोणते उपदेश देतात याचे तंतोतंत पालन जर केले तर त्याच्यासारखा संसारात सुखी कोणी व्यक्ती सापडणार नाही असे कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना सांगितले तसेच आई-वडील यांची सेवा केल्याने येणाऱ्या आपल्या पिढीला त्याचे काय फळ मिळते हे सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले तसेच व्यसनमुक्ती व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचा संसार कसा उद्ध्वस्त होतो हे आपण बऱ्याच ठिकाणी बघितले आहे आणि ज्यांचे व्यसन सुटले आहे किंवा निर्व्यसनी आहे अशा लोकांचे संसार कसे उभे राहिले याचे सुद्धा उदाहरण या ठिकाणी ह भ प मोनिकाताई खाडे यांनी दिली समाजामध्ये वावरत असताना समाजाकडून आपल्याला कशाप्रकारे मानपान मिळेल याकडे आत्ताच्या पिढीला लक्ष देणे गरजेचे आहे आपण कसे वागतो याचे दुसऱ्यांना काही देणं देणं नसते परत तुम्ही जर चुकीचे वागत असाल त्याच्याकडे बोट दाखवल्या जाते व आपण जर चांगला बघत असेल याच्यासाठी सुद्धा एक बोट वर केल्या जातील म्हणून आपण आपल्या संसारासाठी किंवा आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने वागले गेले पाहिजे व चांगले वर्तन केले पाहिजे असे कीर्तनाच्या माध्यमातून मोनिकाताई खाडे यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवभारत युवा प्रतिष्ठानच्यावतीने सर्व येणाऱ्या भाविकां साठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती कीर्तनाच्या शेवटी या कार्यक्रमाचे आयोजक रवी सर यांनी येणाऱ्या सर्व भक्तांचे व नागरिकांचे आभार मानले व या कार्यक्रमाची सांगता झाली

Previous articleतो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली, लातूरचे मनपा आयुक्त मनोहरे प्रकरणात मोठं ट्विस्ट
Next articleउमरगा कृषी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.