आशाताई बच्छाव
जिल्ह्याचा वाढला अभिमान,
‘सीएस’चा झाला सन्मान !
आरोग्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सुविधा अनेक ,झाले चेक ,कारभार नेक,
पाचव्यांदा नंबर एक…..
वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत अलौकिक ,उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाशीमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी राज्यात एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांना राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर ,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.






