Home जालना बनावट भन्ते म्हणून फिरणार्‍या कश्यपली वर कारवाई करण्याची भिख्खू संघ आणि बौध्द...

बनावट भन्ते म्हणून फिरणार्‍या कश्यपली वर कारवाई करण्याची भिख्खू संघ आणि बौध्द समाजाची मागणी; अप्पर पोलीस अधिक्षक यांची घेतली भेट

111

आशाताई बच्छाव

1001395401.jpg

बनावट भन्ते म्हणून फिरणार्‍या कश्यपली वर कारवाई करण्याची भिख्खू संघ आणि बौध्द समाजाची मागणी; अप्पर पोलीस अधिक्षक यांची घेतली भेट                  जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

जालना जिल्ह्यामध्ये बनावट भन्ते म्हणून फिरणार्‍या व बौध्द धम्म मान्य असल्याचे सांगून बौध्द भिख्खूचे चिवर परिधान करुन अवमान करणार्‍या कश्यपली वर कारवाई करावी अशी मागणी सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता भिख्खू संघ आणि बौध्द समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन कायदेशी करावाई करण्याचे निवेदनही देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी कश्यपली हे स्वतःला बौध्द भिख्खू म्हणून घेत फिरत असून तरुणांना हिंसेच्या मार्गावर नेत आहेत. त्यांनी तरुणांची डोके भडकवण्याचे काम सुरु केले आहे. हातात शस्त्र घेऊन ते हिंसेचे समर्थन करीत असून बौध्द धम्म हा हिंसेचे समर्थन करीत नाही. शिवाय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न कश्यपली निर्माण करीत असल्याचेही निवेदनात म्हटलंय. यावेळी भंते शिवली शाक्यपुत्र, भन्ते रेवत, भन्ते धम्मदीप, भन्ते चंद्रमणी, अ‍ॅड. रिमा काळे-खरात, बबन मगरे, राजेश राऊत, संदीप खरात, महेंंद्र रत्नपारखे, संजय हेरकर, राजेश सदावर्ते, विशाल सोनवणे, अलोक सरवडीकर, गौतम वाघमारे, प्रदीप रत्नपारखे, मनोज भिसे, सागर नक्का, दीपक रत्नपारखे, विश्वजीत खरात, समाधान रत्नपारखे, राहुल रत्नपारखे, बबलू साळवे यांच्यासह सकल बौध्द समाजातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्याचा वाढला अभिमान, ‘सीएस’चा झाला सन्मान ! आरोग्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Next articleबिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.