Home बुलढाणा गुटखा माफियाचा पर्दाफाश -जळगाव जामोद येथे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल...

गुटखा माफियाचा पर्दाफाश -जळगाव जामोद येथे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त !

100

आशाताई बच्छाव

1001392819.jpg

गुटखा माफियाचा पर्दाफाश -जळगाव जामोद येथे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
जळगाव जामोद बुलडाणा:- जळगाव जामोद प्रतिबंधित गुटखा व तंबाखू विक्रीवर जोरदार कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्यावर उमेश लाहे (रा. आस्वद, ता. संग्रामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण ₹2.65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडलेल्या या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गुलाब वसावे यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी एफआयआर क्र. 211/25 अंतर्गत अन्न सुरक्षा कायदा 2006 आणि भारतीय न्याय संहितेचे विविध कलम लागू करून गुन्हा दाखल केला आहे.

तपासादरम्यान केसर युक्त विमल, व्ही-1 तंबाखू, डब्ल्यू च्युइंग टोबॅको आणि पान बहार यासारखे प्रतिबंधित प्रकारचे एकूण 978 पॅकेट्स व हजारो पाऊचेस आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून MH-03-AF-5365 क्रमांकाची मारुती सुजुकी गाडी देखील जप्त करण्यात आली. ही कारवाई सपोनि नागेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा मिळाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुटखामुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून ही कारवाई होत असून अन्न व औषध प्रशासनाने अशा कारवायांचा धडका सुरूच ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.