Home बुलढाणा बुलढाण्यात महावीर जयंती निमित्त मांस विक्री बंद ! – मांस विक्री केली...

बुलढाण्यात महावीर जयंती निमित्त मांस विक्री बंद ! – मांस विक्री केली -तर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा !

77

आशाताई बच्छाव

1001392827.jpg

बुलढाण्यात महावीर जयंती निमित्त मांस विक्री बंद ! – मांस विक्री केली -तर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ! मुख्याधिकारी गणेश पांडे यांचा इशारा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा भगवान महावीर जयंती 10 एप्रिल रोजी देशात साजरी होणार आहे. या अनुषंगाने बुलढाणा शहरात मांस विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून नगर परिषदेने यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आणि जगु द्या हा संदेश दिला, त्याला अनुसरून शासन निर्णयानुसार 10 एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश बुलढाणा नगर परिषद प्रशासनाने जारी केले आहे.
बुलडाणा नगर परिषद हद्दीत 10 एप्रिल रोजी महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार 10 एप्रिल रोजी बुलडाणा शहरात कोठेही मांस विक्री करु नये. सदर सुचनेनुसार बुलडाणा शहर हद्दीमध्ये कोणत्याही व्यक्ती/नागरीक मास विक्री करतांना निदर्शनास आल्यास नगर परिषद अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येवुन वेळप्रसंगी संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा बुलढाणा नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिला आहे.

Previous articleगुटखा माफियाचा पर्दाफाश -जळगाव जामोद येथे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त !
Next articleEXCLUSIVE! चिखलीत खळबळजनक घटना : विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह – दोन दिवसांपासून होती बेपत्ता ! –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.