Home बुलढाणा 31 मार्चला मद्यपींची पंचाईत ! जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कोरडा दिवस जाहीर !’

31 मार्चला मद्यपींची पंचाईत ! जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कोरडा दिवस जाहीर !’

150

आशाताई बच्छाव

1001365413.jpg

31 मार्चला मद्यपींची पंचाईत ! जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कोरडा दिवस जाहीर !’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यात सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी किंवा चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे रमजान ईदचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि सार्वजनिक शांततेस बाधा येऊ नये, यासाठी दारूबंदी कायदा
१९४९ च्या कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ३१ मार्च “कोरडा दिवस” म्हणून जाहीर केला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, परवानाकक्ष, तसेच बिअर बार संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. सर्व अनुज्ञप्तीधारकांनी हे आदेश पाळावेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleघरमालकाने मध्यरात्री दरवाजा उघडला अन् दिसलं भलतचं; दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; मोठ्या मेऱ्याच्या घटनेची जोरदार चर्चा..
Next articleइम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमी नंतर 16 मोबाईलचा शोध !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.