Home बुलढाणा इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमी नंतर 16 मोबाईलचा शोध !

इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमी नंतर 16 मोबाईलचा शोध !

155

आशाताई बच्छाव

1001365443.jpg

इम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमी नंतर 16 मोबाईलचा शोध !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरी होत असल्याच्या घटनेवर नुकताच ‘युवा मराठा ‘ ने प्रकाशझोत टाकला होता. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना आदेश दिल्याने चोरी गेलेल्या 16 मोबाईलचा शोध लावला आहे. हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले आहे.
दर रविवारी बुलढाणा येथे बाजार भरतो. या बाजारात गेल्या रविवारीच 6 जणांची मोबाईल चोरी गेल्याची ओरड होती. हा मुद्दा ‘युवा मराठा ‘ ने उचलून धरला! अनेक जण पोलीस स्टेशनची पायरी चढणे उचित समजत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात ते तक्रार करत नाहीत. मात्र काही लोक कायदा अस्तित्वात असल्याने तक्रारी करतात. अशाच 16 तक्रारकर्त्यांना त्यांचे मोबाईल पोलिसांच्या शोधामुळे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान दर रविवारी आठवडी बाजारात पोलिसांचा चांगला बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.