Home बुलढाणा घरमालकाने मध्यरात्री दरवाजा उघडला अन् दिसलं भलतचं; दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; मोठ्या...

घरमालकाने मध्यरात्री दरवाजा उघडला अन् दिसलं भलतचं; दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; मोठ्या मेऱ्याच्या घटनेची जोरदार चर्चा..

152

आशाताई बच्छाव

1001365393.jpg

घरमालकाने मध्यरात्री दरवाजा उघडला अन् दिसलं भलतचं; दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; मोठ्या मेऱ्याच्या घटनेची जोरदार चर्चा..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील मेरा बु येथे घडलेल्या एका घटनेची जोरदार चर्चा. एक चोरटा मध्यरात्री एका घराच्या मागच्या दरवाजाने घरात शिरला. मागून तो दुसऱ्या मजल्यावर चढला, त्यानंतर घरात चोरी करण्याच्या उद्देशानेच शोधाशोध करू लागला.. तेवढ्यात घरमालकाला जाग आली, त्यांनी दरवाजा उघडल्यावर चोरटा त्यांच्या खोलीत उभा दिसला.. घर मालकाला पाहून चोरटा घाबरला.. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.. मात्र त्याला घरमालकाने व इतरांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश राजू भुसारी (रा. मेरा बु) असे चोरट्याचे नाव आहे. गणेश हा अनंता जगन्नाथ अवचार यांच्या घरात शिरला होता अनंता अवचार यांच्या तक्रारीवरून गणेश विरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleप्राचीन बारव तोडून शादीखाना बांधल्याची तक्रार केल्याने जबर मारहाण ! – 7 जणां विरुद्ध गुन्हा दाखल
Next article31 मार्चला मद्यपींची पंचाईत ! जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कोरडा दिवस जाहीर !’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.