आशाताई बच्छाव
शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक करा
अन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला तत्काळ अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शुक्रवार दि. २१ रोजी मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हयासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही समाजकंटक हेतुपुरस्सर अवमान होईल, अशी टीका टिप्पणी करतात व त्यावर शासन कठोर कायदेशीर कारवाई करताना दिसत नाहीत उलट अशा आरोपींना पोलीस, सरकार फरार होण्यासाठी मदत करत असल्याचे दिसुन येत आहे. हे अतिशय गंभीर आहे. गुन्हेगार सोशल मिडीयात आपली जाहीर भूमिका मांडतात. जामिनासाठी राजरोस फिरतात मात्र पोलिसांना गुन्हेगार सापडत कसा नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून, राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत. शिवद्रोह्यांना राज्यसरकार जी महत्वाची वागणूक देत आहे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही गुन्हेगारासम कठोर कारवाई करत उचलून आणून अटक करत नाही, तसेच त्यांच्या पाठीमागील मास्टरमाईंडचा शोध घेत नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती आहे.