आशाताई बच्छाव
खेरवाडी येथे स्व.बाळासाहेब गणपत पाटील आवारे ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
रक्तदान शिबीरात तरुणांचा उत्साह अधिक
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
खेरवाडी तालुका निफाड येथील सामाजिक संस्था स्वर्गीय बाळासाहेब गणपत पाटील आवारे ट्रस्टच्या वतीने संस्थेचे सरचिटणीस श्री शरद आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण रक्तपेढी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उस्फूर्तपणे तरुणांनी सहभाग घेऊन श्रेष्ठदान रक्तदान केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष आवारे यांनी याप्रसंगी आपल्या प्रासंगिक भाषणामध्ये रक्तदान ही काळाची गरज असून आपल्या एका रक्तदानाने असंख्य जीव वाचू शकतात देशाला रक्ताची अत्यंत गरज असल्यामुळे तरुणांच्या या सहभागामुळे लोकांचे जीव वाचवण्यात आपण खारीचा वाटा उचलू शकतो या प्रकारची माहिती उपस्थित तरुणांना व रक्तदात्यांना त्यांनी दिली.या रक्तदान शिबिरात २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी खेरवाडी गावचे सरपंच सौ.प्रतिभा अरुण संगमनेरे, उपसरपंच कैलास संगमनेरे सदस्य विजय लांडगे, पप्पू उगले, चेअरमन बाबाजी संगमनेरे, मा.सभापती शंकर संगमनेरे, योगेश आवारे, सतीश संगमनेरे, पुंजाराम आवारे, विलास आवारे, गोविंदराव संगमनेरे, बापू संगमनेरे, मधुकर आवारे, संदीप आवारे, अरुण संगमनेरे, दशरथ संगमनेरे, कृष्णा लांडगे, सोमनाथ संगमनेरे, राकेश आवारे, विनोद आवारे, दिलीप संगमनेरे, संजय आवारे, शाम आवारे, योगेश हांडगे, तुषार पवार आदी पदाधिकारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांचे आभार ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष आवारे यांनी मानले व ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली






