Home बुलढाणा बापरे ! तब्बल 4 बिबट्यांचा म्हाडा कॉलनी परिसरात मुक्तसंचार ! – वन...

बापरे ! तब्बल 4 बिबट्यांचा म्हाडा कॉलनी परिसरात मुक्तसंचार ! – वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात !

140

आशाताई बच्छाव

1001623186.jpg

बापरे ! तब्बल 4 बिबट्यांचा म्हाडा कॉलनी परिसरात मुक्तसंचार ! – वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा अगदी डोंगराच्या काठावर वसलेली बुलडाणा येथील म्हाडा कॉलनी परिसरात एक नव्हे तर तब्बल 4 बिबटे 17 जूनच्या सायंकाळी 7 वाजेपासून तर रात्री उशीरा पर्यंत ठाण मांडून होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याची माहिती मिळताच बुलडाणा वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या बिबट्यांना जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न वन विभागाकडून रात्री उशीरा पर्यंत सुरू होता. बुलडाणा शहरातील म्हाडा कॉलनी हा विस्तारित भाग असून अगदी अजिंठा पर्वत रांगेच्या काठावर वसलेला आहे. जंगलाला लागून असल्या कारणाने अनेक वेळा या ठिकाणी बिबट, अस्वल, तडस सारखे हिंस्त्र प्राणी येतात. काल 17 जूनच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास महाडा कॉलनी परिसरात एक मादी बिबट व तिचे 3 बछडे काही नागरिकांना दिसून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले व त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. काही वेळातच वनविभागाची रेस्क्यू टीम म्हाडा कॉलनी परिसरात दाखल झाली व बिबट्यांना हाकलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु काही वेळानंतर पुन्हा हे बिबटे त्याच ठिकाणी परत येत होते. रात्री एक वाजेपर्यंत वन विभागाची टीम या बिबट्यांवर लक्ष ठेवून होती. शेवटी बऱ्याच वेळा नंतर बिबट्याचा हा परिवार जंगलात निघून गेला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनो सावधान रहा !

बुलढाणा शहरातील अनेक नागरिक म्हाडा कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकला जातात, अशात या भागात बिबटे वावरत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या भल्या पहाटे एकटे जाऊ नये, नागरिकांनी सकाळी 8 वाजेच्या नंतर या परिसरात मॉर्निंग वॉकला जावे तसेच सावधानता बाळगावी. बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागाला काळवावे, असे आवाहन बुलडाणा वनपाल मोहसीन खान यांनी केले आहे.

Previous articleस्पार्क फाऊंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleEXCLUSIVE स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणावर अजितदादांचा भावनिक प्रतिसाद – ‘मी स्वतः लक्ष घालतो’, CID चौकशीचे निर्देश!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.