Home पालघर स्पार्क फाऊंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्पार्क फाऊंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

223

आशाताई बच्छाव

1001623181.jpg

स्पार्क फाऊंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप पालघर :सौरभ कामडी -शैक्षणिक वर्ष सुरू झाले की मुलांना नवीन कपडे , पुस्तके, बूट शासनाकडून मिळतात . मात्र लेखन साहित्य पालकांना बाजारातून विकत घ्यावे लागते , ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे, पालक वर्षभराच्या मजुरीतून साठवलेले पैसे पेरणीच्या आणि शेतीच्या कामासाठी वापरतात मग मुलांना असे महागडे साहित्य कुठून घेणार . हीच अडचण शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक काम करणारी स्पार्क फाऊंडेशन चे अध्यक्ष . मकरंद दिक्षित , नितीन पिठोले यांच्या लक्षात आणून दिली. आणि आज दिनांक 20/06/20250 रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे शाळेतील एकूण 126 मुलांना , दुरेघी, चार रेघी, बॉक्स , चित्रकला वह्या, अंकलीपी, आणि पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, रंगखडू , कंपास पेटी, इत्यादी वर्षभर पुरेल एवढ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . प्रसंगी स्पार्क फाऊंडेशन चे जिल्हा प्रमुख नितीन पिठोले, शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते . स्पार्क फाऊंडेशन चे हे शैक्षणिक कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात गेल्या तीन चार वर्षापासून हातभार लावत आहे .

Previous articleसाह्यक अभियंता राजीव भुजबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
Next articleबापरे ! तब्बल 4 बिबट्यांचा म्हाडा कॉलनी परिसरात मुक्तसंचार ! – वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.