Home नांदेड केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम.

केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम.

17
0

आशाताई बच्छाव

1001341801.jpg

केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. २१ मार्च:- दु.१.२४ वाजताची वेळ ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय अंतर्गत ज‍िल्‍हा आपत्‍तकालीन कार्य केंद्रात फोन, धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेजची घटना घडली असून परिस्‍थिती हाताळण्‍यासाठी मदत करावी असा दुरध्‍वनी संदेश कंपनीकडून आला.

आणि ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्य केंद्रातील कर्तव्‍यावरील कार्यरत कर्मचारी ही बाब लगेचच दौ-यावर असलेल्‍या ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांना कळव‍िले . परीस्‍थ‍िती लक्षात घेता तात्‍काळ ज‍िल्हाध‍िकारी व न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी यांच्‍याशी चर्चा करुन एनडीआरएफ पथकाला या आपत्‍तीपासून बचाव करण्‍याकामी पाचारण करण्‍याचे ठरले.

तात्‍काळ एनडीआरएफ पुणे येथील ५ नं.बटालीयनला संर्पक साधुन तात्‍काळ पाचारण केले. तोपर्यत स्‍थानीक अग्‍नीशमन पथक मनपाचे व एम.आय.डी.सी.चे अग्‍नीशमन अध‍िकारी हे तेथील पर‍िस्थित न‍ियंत्रणात आणन्‍याचा शर्तीने प्रयत्‍न करत होते. यांच्‍यासोबत कंपनीचा सुरक्षा व‍िभागही प्रयत्‍न करत होता.

उपव‍िभागीय अध‍िकारी,तहस‍िलदार, गटव‍िकास अध‍िकारी, मुख्‍याध‍िकारी व आरोग्‍य अध‍िकारी हे आपल्‍या पथकासह समन्‍वय साधुन घटनास्‍थळी हजर होते. एन.डी.आर.एफ.च्‍या केमिकल आपत्‍ती पासुन बचाव करणा-या पथकाचे आगमन झाले त्‍यांना स्‍थानीक प्रशासन व व‍िव‍िध यंत्रणांच्‍या मदतीने अचुक केमिकलची माहिती घेऊन काही वेळात ही टॅकरमध्‍ये केमिकल भरतांना ल‍िकेजमुळे लागलेली आग आटोक्‍यात आणली. लगेचच यादरम्‍यान जखमी झालेल्‍यांना कंपनीच्‍या रुग्‍णवाहीकेतून उपचारासाठी नेण्‍यात आले. अशा प्रकारे ही केमिकल आपत्‍ती मध्‍ये आपत्‍तीचे निवारण शोध व बचाव कार्य कसे करायचे एकंदरीत आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन कसे करायचे याबाबतचा सराव अभ्‍यास सर्व यंत्रणाच्‍या व एन.डी.आर.एफ.च्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांनी हा रंगीत तालीम-सराव अभ्‍यास घडवून आणला.

२० मार्च २०२५ रोजी युनायटेड स्‍प‍िरीट ल‍ि.बाळापूर ता. धर्माबाद ज‍ि. नांदेड येथे एनडीआरएफ 5 न. पुणे यांच्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेडच्‍यावतीने ज‍िल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष राहुल कर्ड‍िले, न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कु-हे यांनी ही केमिकल आपत्‍ती बाबत टेबल टॉक व मॉक एक्‍सरराईज दोन सत्रामध्‍ये सकाळी १०.३० ते दु.४.३० या दरम्‍यान घडवून आणली.

यावेळी धर्माबाद च्या उपविभागीय अधिकारी स्‍वाती दाभाडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य ध‍ि.रा.खिरोडकर उपसंचालक, एनडी आरएफ निरीक्षक बृजेश कुमार रेंकवार, अग्नीशमन अधिकारी डी.एन.गायकवाड , न‍िलेश कांबळे, आडळकर ए.आर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, कंपनीचे प्रकाश बोदडे,सुदीप त‍िवारी ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणाचे गौरव त‍िवारी, बारकुजी मोरे व धर्माबाद उपव‍िभागील धर्माबाद, उमरी येथील नगर परीषद, पंचायत समिती, अग्‍नीशमन, पोलीस, आरोग्‍य व इतर सर्व यंत्रणांचे अध‍िकारी कर्मचारी यांची उपस्‍थ‍िती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here