Home नांदेड आरोग्यदायी समाज निर्मितीमध्ये रुग्ण सेवा मंडळाची भूमिका महत्वपूर्ण –डॉ. शंकर लेखणे

आरोग्यदायी समाज निर्मितीमध्ये रुग्ण सेवा मंडळाची भूमिका महत्वपूर्ण –डॉ. शंकर लेखणे

29
0

आशाताई बच्छाव

1001340669.jpg

आरोग्यदायी समाज निर्मितीमध्ये रुग्ण सेवा मंडळाची भूमिका महत्वपूर्ण –डॉ. शंकर लेखणे

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर :- आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सामाजिक कार्य करणा-या संस्था व समाजसेवकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य करण्यारे समाज सेवक व सामाजिक संस्थाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक नागरिक हा समाज व राष्ट्राप्रती कृतज्ञाता भाव ठेऊन व कर्तव्य भावनेतून सामाजिक कार्य केले पाहिजे. देगलूर येथील रुग्ण सेवा मंडळ हे मराठवाड्यातील एक आदर्श एन.जी. ओ. आरोग्याच्या क्षेत्रात कार्य करणारी एक नामवंत संस्था आहे असे प्रतीपादन स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड येथील लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे सदस्य तथा श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय, शंकरनगर लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. शंकर लेखणे यांनी केले आहे. ते अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण सेवा मंडळास अभ्यास भेट व नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्ण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा अ. व्या.शिक्षण संस्था कार्यकारी मंडळ सदस्य सुर्यकांत गोविंदराव नारलावार होते. तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून देगलूर महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ, ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, रुग्ण सेवा मंडळ कोषाध्यक्ष , प्रा.व्ही.जी.चिंतावार ,दमणसेठ चिद्रावार , मारोती गायकवाड , डॉ. संतोष येरावार , सुभाष वडगावे उपस्थित होते. या प्रसंगी विचार मांडताना प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी देगलूर महाविद्यालय व रुग्ण सेवा मंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून याकराराद्वारे ग्रामीण भागात गोर गरीब व गरजू लोकांचे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर आयोजित केले जात आहे. तसेच महविद्यालयातील विद्यार्थासाठी विविध शिबिरे आयोजित करुण आरोग्य विषयक प्रबोधन केळे जात आहे. व महविद्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ परस्पर सहयोगातून महविद्यालय व ग्रामीण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासून आरोग्य सेवा देत आहेत. असे प्रतिपादन केले आहे. लोकप्रशासन विभागप्रमुख तथा रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. बा. रा.कतुरवार यांनी प्रास्तविक विचार मांडताना नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार नांदेड विद्यापीठाने लोकप्रशासन विषयात एन.जी.ओ. एडमिनीस्ट्रेशन हा नवीन पेपर सुरु केलेला आहे. विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या आत शिक्षण देण्याबरोबर आदर्श एन.जी.चा अभ्यास करता यावा , त्यांचे प्रशासन प्रत्यक्ष पाहता यावे या उद्देशाने रुग्ण सेवा मंडळास अभ्यास भेट व मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित केल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना कोषाध्यक्ष प्रा.व्ही.जी.चिंतावार यांनी देगलूर शहर व परिसरातील गोरगरीब रुग्णांना नाममात्र दरामध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी इ.स. 1977 मध्ये रुग्ण सेवा मंडळ या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेद्वारे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आजपर्यंत हजारो रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर विविध आजारावर उपचार करण्यात आले असल्याचे सांगितले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 67 विद्यार्थ्याची मोफत नेत्रतपासणी नेत्रतपासणी डॉ.प्रतिभा तोरणे यांनी केली. . या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय देबडे तर आभार डॉ.व्यंकट खंद्कुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू शिंदे, विशाल कुडकेकर, चेताली पातावार, मुखेडकर शैला यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here