Home उतर महाराष्ट्र साक्रीच्या टिटाणेत अखेर जलजीवन मिशन योजनेची चौकशी सुरू, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल...

साक्रीच्या टिटाणेत अखेर जलजीवन मिशन योजनेची चौकशी सुरू, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या आदेशानुसार चौकशी गतिमान

351

आशाताई बच्छाव

1001575912.jpg

धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ-  अखेर जलजीवन मिशन योजना टिटाणे तालुका साक्री जिल्हा धुळे. येथील बहु चर्चेत असलेली ही योजना आज रोजी दिनांक सहा जून अखेर चौकशीला सुरुवात करण्यात आली पंचायत समिती साक्री यांना वेळोवेळी निवेदने आणि प्रत्यक्ष भेटून साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे. तसेच उपअभियंता पवार साहेब यांना या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती मात्र या योजनेसंदर्भात ग्रामपंचायतीचे नेते सुभाष माळचे. तसेच युवा मराठा न्यूज चे प्रतिनिधी संदीप पाटील. यांनी या या योजनेसंदर्भात गावाची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे म्हणून हा विषय गांभीर्याने घेऊन जलदूत प्रमाणे या विषयाचा माथेरान पाठपुरावा करून धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ नरवडे साहेब. व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता साळवे मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करून या गंभीर विषयाची दखल घेऊन आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. अशी विनंती . संबंधित तक्रारदार यांनी. जिल्हा परिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाची दखल सीईओ साहेबांनी घेतली व संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले. संबंधित तक्रारदार यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे मागणी केली की साक्री पंचायत समितीचे कुठल्याही इंजिनिअर अथवा अधिकाऱ्यांना या चौकशी समितीत घेऊ नये कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांनी तक्रारदार यांची मागणी मान्य करत. शिंदखेडा पंचायत समितीचे उपअभियंता सोनवणे तसेच जी ई इंजिनिअर चौधरी तसेच साक्री पंचायत समितीचे काही कर्मचारी . यांच्या माध्यमातून संपूर्ण कामाची चौकशी करण्यात आली. शिंदखेडा पंचायत समितीचे उपअभियंता सोनवणे. यांनी संबंधित तक्रारदार यांना सांगितले. की चौकशी अहवाल. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे पाठवून तुम्हाला पुढील कारवाई काही दिवसात कळवू असे त्यांनी सांगितले. यामुळे संबंधित तक्रारदार यांना आशा आहे की गावाला शुद्ध पिण्याचे पाणी लवकरच मिळेल.. जोपर्यंत या योजनेचे शुद्ध पिण्याचे पाणी गावाला मिळत नाही तोपर्यंत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरूच राहील. कारण ही योजना गावासाठी अत्यंत महत्त्वाची असून काही गावातील ठराविक बगलबच्च्यांनी या योजनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे तो कदापी होऊ देणार नाही असेही तक्रारदार यांनी सांगितले. गावासाठी आलेल्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचतील व गावाचा विकास होईल या हेतूनेच संघर्ष करत आहोत असे तक्रारदार यांनी सांगितले.

Previous articleसमाजसेवक भूमिपुत्र वाघ यांचा विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा.
Next articleआमदार साहेब रुसले ,पुण्यात जाऊन बसले.!जनतेने तुमचं काय घोडं मारलं? थोडक्या मताने का होईना त्यांनीच तुम्हाला तारलं….           
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.