Home भंडारा टू व्हीलर गाडीला नव्या नंबर प्लेटच्या नावाखाली शासनाकडून करोडो रुपयाची लूट

टू व्हीलर गाडीला नव्या नंबर प्लेटच्या नावाखाली शासनाकडून करोडो रुपयाची लूट

219

आशाताई बच्छाव

1001283916.jpg

टू व्हीलर गाडीला नव्या नंबर प्लेटच्या नावाखाली शासनाकडून करोडो रुपयाची लूट

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)फ्रॅन्चाईजींना इतर राज्यापेक्षा कितीतरी अधिकचे दर मंजुर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात गरीब मध्यम वर्गीयांच्या दुचाकीची नंबरप्लेटची किंमत ४५० रुपये मंजुर केली आहे, तिच गुजरात मध्ये १६० रुपये, गोव्यात १५५ रुपये, पंजाबात २०० रुपये, आंध्रात २४५ रुपये आहे. गुजरात मध्ये जी नंबर प्लेट १६० रुपयात (ही सुद्धा अधिक आहे) देणे परवडते, ती महाराष्ट्रात तब्बल ४५० रुपयांना कां? कुणी मंजुर केले हे दर? किती मोठे डिल झाले?

हातावर पोट असणाऱ्या गरीब रिक्षा चालकांच्या तीन चाकी वाहनास महाराष्ट्रात नंबर प्लेट मिळेल ५०० रुपयांना.तिच नंबर प्लेट गुजरात मध्ये २०० रुपयांना, गोव्यात १५५ रुपयांना, पंजाबात २७० रुपयांना, आंध्रात २८२ रुपयांना आहे.

मोटार कारची नंबरप्लेट महाराष्ट्रात मिळेल तब्बल ७४५ रुपयांना. तिच नंबर प्लेट गुजरातमध्ये आहे ४६० रुपयांना, गोव्यात आहे २०३ रुपयांना, पंजाबात आहे ५९४ रुपयांना, आंध्रात आहे ६१९ रुपयांना.

ट्रक वगैरे व्यावसायिक वाहनांना महाराष्ट्रात ही नंबरप्लेट मिळेल ७४५ रुपयांना. तिच नंबरप्लेट गुजरात मध्ये आहे ४८० रुपयांना, गोव्यात आहे २३२ रुपयांना, पंजाबात आहे ६३४ रुपयांना, आंध्रात आहे ६४९ रुपयांना.

किती ही तफावत! कुठे आहे वन नेशन वन टॅक्स! याबाबत कंत्राटामध्ये संपूर्ण कामाची रक्कम ६०० कोटी दाखविण्यात आली आहे. परंतु रजिस्टर्ड वाहनांची संख्या पाहता, हे प्रकरण दीड हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे जनमंच संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी म्हटले आहे.

या दीड हजार कोटीतून कुणाच्या वाट्याला काय – काय येणार आहे, हा संशोधनाचा भाग ठरेल. हा राज्याचा विषय आहे. मात्र केंद्रिय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी हे तर मोठे बोलबच्चन मंत्री म्हणून देशभरात गाजत असतात.

“कमाई करूनही नबंर प्लेटचे जे दर गुजरातला परवडतात, ते महाराष्ट्राला कां नाही? ” असा जाहीर प्रश्न करून त्यांनी महाराष्ट्राच्या महाभ्रष्ट्र परिवहन विभागाला सुतासारखे सरळ केले पाहिजे होते.

महाराष्ट्रात वाहन रजिस्ट्रेशन ते चेकपोस्ट पर्यंत वाहन धारकांचे सर्व स्तरावर शोषण आणि शोषण करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. त्यामुळे वैतागलेला एखादा वाहन धारक हाती हंटर घेवू शकतो. असे म्हटले जाते. कृपया कुणीही या प्रकारे हाती हंटर घेवू नये!

असेच कुणीही ‘ नियम पाळू ‘ नागरिक म्हणेल. पण कोणत्याही शोषणाला सहन करण्याची संयमाची एक मर्यादा असते. ही बाबही नाकारून चालणारी नाही.

Previous articleनिफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी
Next articleचित्रकार प्रदीप शिंदे यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.