Home जालना गोवंश चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात त्यांच्याकडून रु.15, 51,400/_ रुपयाचा...

गोवंश चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात त्यांच्याकडून रु.15, 51,400/_ रुपयाचा मुद्देमाल जप्त 22 गुन्हे उघडतील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

114

आशाताई बच्छाव

1001283721.jpg

गोवंश चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात त्यांच्याकडून रु.15, 51,400/_ रुपयाचा मुद्देमाल जप्त 22 गुन्हे उघडतील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधि – मुरलीधर डहाके
दिनांक 28/02/2025
सविस्तर वृत्त असे की दिनांक 17/02/2025 रोजी पोलीस ठाणे चंदनझिरा , जालना येथे फीर्यादी नामे अंकुश भीमराव थोरात, वय 39 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार रॉयल नगर नवीन मोंढा जालना यांनी फिर्याद दिली की दिनांक 16/02/2025 रोजी 01.15 वाजेच्या सुमारास त्याच्या व त्यांच्या शेजारी राहणारे गणेश विठ्ठल घोरपडे व विजयमाला धोंडीराम चव्हाण यांच्या तीन गाई अज्ञात चोरांनी चोरी केल्या असल्याचे कारणावरून चंदनझीरा पोलीस ठाणे येथे गू.र.क्र. 71/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणनेबाबत मा.पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव साहेबांनी एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पुण्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदरामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी नामे 1) शेख इस्माईल शेख शेख इब्राहिम वय 28 वर्ष राहणार सीटीएस नंबर 91 जाफरनगर मालेगाव ता. मालेगाव जि.नाशिक 2) इस्तेयाक खान अल्ताफ खान वय 29 वर्ष रा.घर नं.835 गल्ली नं.07 गुलशेरनगर मालेगाव, जि. नाशिक यांनी व त्यांच्या साथीदारांनी केला असून ते सध्या सिल्लोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा सिल्लोड येथे शोध घेतला असता ते मिळून आले असून उर्वरीत 3 आरोपी फरार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या 01इनोव्हा कार आणि 3 मोटार सायकल , मोटार रीवायंडिगकामी वापरण्यात येणारे तांबा क्वाइल , तार असा ऐकून रु.15,51,400/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे गोवंश चोरीच्या आणखी पुण्याबाबत चौकशी केली असता त्यांनी जालना जिल्ह्यातील नंदापूर शिवार, मांजरगाव शिवार ,भारज शिवार, डोंगरगाव शिवार, लिंगेवाडी शिवार, टाकळी शिवार ,कोठा दाभाडी, संगमेश्वर गव्हाण शिवार,वरूड बुद्रुक शिवार, नांदखेडा शिवार, मोहळाई शिवार, सीपोरा बाजार, जवखेडा खुर्द, जळगाव सपकाळ शिवार, कुकडी शिवार ,जळगाव सपकाळ शिवार ,पिंपळगाव शिवार, ठिगळखेडा शिवार,या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी जनावरे चोरी केले असल्याचे कबुरी दिली असून 19 गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच त्यांनी मालेगाव येथून इनोव्हा कार मध्ये चोरून आणलेले मोटार रिवाइंडिंग कामी वापरण्यात येणारे तांबा क्वाइन तार मिळून आले असून सदर बाबत पोलीस ठाणे तालुका मालेगाव नाशिक येथे गु.र.क्र. 141/2025 कलम 331(4),305, 3(5) भा.न्या.स.अन्वये गुन्हा दाखल आहे.

तसेच आरोपीतांच्या ताब्यातून मिळालेली होंडा यूनिकॉर्न मोटरसायकल सुद्धा चोरीची असल्याची तपासात निष्पन्न झाल्याने सदर मोटरसायकल पडेगाव इथून चोरी केली असून पोलीस ठाणे छावणी छत्रपती संभाजीनगर येथे गु.र.क्र.36/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनि.योगेश उबाळे , पोउपनी. राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे आमलदार रामप्रसाद पवार ,प्रभाकर वाघ, रुस्तुम जैवाळ, गोपाल गोशिक,रमेश राठोड, सागर बाविस्कर, कैलास खर्डे,इरशाद पटेल,सतीश श्रीवास्तव, संदीप चिंचोले,रमेश काळे, सचिन राऊत यांनी केली आहे.

Previous articleमंजूर घरकुलाचा हप्ता काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा अभियंता रंगेहाथ पकडला!
Next articleटेंभुर्णी येथील श्री पंडीत सुरशे यांचे लोणावळा येथील टायगर हिल टाटा अल्ट्रा मॅरेथॉन रन स्पर्धेत रेकॉर्ड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.