आशाताई बच्छाव
भोकरदन पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता प्रदीप राठोड याला 5000 ची लाच घेताना रंगे हात पकडले
युवा मराठा न्यूज रिपोर्टर भोकरदन गजेंद्र लोखंडे भोकरदन पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता प्रदीप राठोड याला 5000 रुपयाची लाच घेताना पकडले आहे भोकरदन तालुक्यातील सेलूद तेथील रहिवाशी यांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते घरकुलाचा पहिला हप्ता मिळून बांधकाम चालू केले होते परंतु दुसरा हप्ता टाकण्यासाठी श्री राठोड यांच्याकडे गेले असता त्यांनी वीस हजार रुपयांची मागणी केली होती प्रथम पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते पाच हजार रुपये घेत असताना एसीबीने राठोड यांना रंगेहात पकडले आहे आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले यांचा आवाज योजनेअंतर्गत घरकुलाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी वीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाज देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 27.2.2025 रोजी जालना येथील एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दिली होती त्या तक्रार एसीबीने पडताळणी केली असता राठोड यांना भोकरदन येथील हिंदुस्तान झेरॉक्स ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी पाच हजाराची लाच घेताना पकडले आहे पुढील कारवाई पोलीस करीत आहे






