Home जालना टेंभुर्णी येथील श्री पंडीत सुरशे यांचे लोणावळा येथील टायगर हिल टाटा अल्ट्रा...

टेंभुर्णी येथील श्री पंडीत सुरशे यांचे लोणावळा येथील टायगर हिल टाटा अल्ट्रा मॅरेथॉन रन स्पर्धेत रेकॉर्ड

268

आशाताई बच्छाव

1001283751.jpg

टेंभुर्णी येथील श्री पंडीत सुरशे यांचे लोणावळा येथील टायगर हिल टाटा अल्ट्रा मॅरेथॉन रन स्पर्धेत रेकॉर्ड

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 01/03/2025

सविस्तर वृत्त असे की लोणावळा येथील टायगर हिल वर टाटा अल्ट्रा मॅरेथॉन रन स्पर्धा 23 फेब्रुवारी 2025 ला घेण्यात आली .भारतातील अतिशय खडतर व आव्हानात्मक मानली जाणारी लोणावळा येथील टायगर हिल वर असणारी टाटा अल्ट्रा मॅरेथॉन रन स्पर्धा संपूर्ण घाटात असून स्पर्धेची सुरुवात रात्री एक वाजेपासून सुरु होते.त्यामुळे लाईट डोक्यावर लावूनच पूर्ण करावी लागते. टेंभुर्णी येथील निलेश क्लीनिकल लॅब चे संचालक श्री पंडित सुरशे यांनी 50 किलोमीटर रन ची स्पर्धा अवघ्या 5 तास 28 मिनिटात पूर्ण करून नवीन वैयक्तिक रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्याबद्दल टेंभुर्णी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले मॉर्निंग ग्रुपचे मित्र धीरज काबरा, डॉ पवन वऱ्हाडे, डॉ दीपक नागरे, डॉ शिवहरी जायभाये, सर्जेराव कुमकर, डॉ अविनाश सुरुशे, डॉ रमेश मोठे, मनीष सोमाणी, गोपाल बांगड, राजू करवंदे, प्रदीप शेठ काबरा यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचे वर जाफराबाद तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.