आशाताई बच्छाव
मा.न्यायालयाच्या आवारामध्ये धारदार तलवार कोयता लोखंडी कुऱ्हाड बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीसह एकास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 12/02/2025
जालना जिल्ह्यात धारदार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमाची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.
त्यावरून हे पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी गुक्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील आरोपी नामे श्रीकांत उर्फ शिऱया ऋषीकुमार तडेपकर 35 वर्ष राहणार सरस्वती मंदिर जवळ खरपुडी रोड जालना हा त्याचे साथीदार सागर शांतीलाल रेड्डी वय वर्ष 33 राहणार कानडी वस्ती रामनगर जालना याचे सह न्यायालयाच्या आवारामध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने विनापरवाना हे कायदेशीर रित्या धारदार तलवार, लोखंडी दांडा असलेली कुऱ्हाड व कोयता स्वतःच्या व कब्जात वागत आहे. अशी खात्रीलायत माहिती मिळणे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून त्यांना सदर आरोपींना ताब्यात घेणे सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने सदर आरोपी त्यांचा मा. न्यायालयाच्या आवारात मध्ये शोध घेत असताना आरोपी हे जिल्हा परिषद जालना मधील कॅन्टीन जवळ मिळून आल्याने त्यांचे कडून 4000 रुपये किमतीची धारदार तलवार लोखंडी दांडा असलेले कुऱ्हाड व कोयता जप्त करण्यात आला आहे .विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष निपाणी अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय परिसरात जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव ,पोलीस निरीक्षक जालना श्री गणेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस आमदार गोपाल घोषित, रमेश राठोड, भाऊराव गायके ,प्रसाद पटेल, सतीश श्रीवास्तव, अंकुर घाडगे, रमेश काळे सर्व ने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.






