Home नांदेड मुखेड वनपरिक्षेत्र लोहा तालुक्यातील घोटका येथे आढळली मगर.

मुखेड वनपरिक्षेत्र लोहा तालुक्यातील घोटका येथे आढळली मगर.

213

आशाताई बच्छाव

1001227180.jpg

मुखेड वनपरिक्षेत्र लोहा तालुक्यातील घोटका येथे आढळली मगर.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील घोटका परिसरात दि. 11 फेब्राुवारी 2025 रोजी मोठी मगर आढळून आली असुन वन कर्मचारी व सर्पमित्राच्या सहाय्याने मगरीला पकडण्यात यश आले आहे.

दि. 11 फेब्रुवारी रोजी घोटका गावातून वनपरिक्षेत्र कार्यालय मुखेड अंतर्गंत कंधार येथील कर्मचा-यास फोन आला आणि दगड धोंडे आडोशात भली मोठी मगर आहे. पकडण्यासाठी कर्मचारी पाठवा…! कार्यालयातून कंधार येथील वनपाल शंकर धोंडगे,वनसंरक्षक अरुण राठोड,शिवसांब घोडके,परमेश्वर टेकाळे, खयूम शेख व सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावक-यांच्या सहकार्याने मगरीस पकडण्यात यश आले.

या कामास नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे,सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा ) भिमसिंग राठोड,मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ,निखील हिवरे यांनी मार्गदर्शन केले तर वनसंरक्षक धम्मपाल सोनकांबळे,लक्ष्मण पांडुरणे,शेख महेबुब, प्रभु राठोड नदान शेख व ब्रम्हा राठोड यांनीही परिश्रम केले.